मुख्य मजकुरावर जा

Decomposition Explained || Kurious Kale clips

८.२ हजार व्ह्यूज 8 फेब्रुवारी 2026 3:02

या टॉकबद्दल

राहुल आणि संपदा कुलकर्णींनी क्युरिअस काळेंना कन्फ्युज करुन टाकलंय! त्याचं काय झालं, गप्पांच्या ओघात काळेंना कळलं, की कुलकर्णी दांपत्याकडे झकास गोठा आणि गाई, म्हशी, बैल, वासरं असं बक्कळ काय काय आहे. क्युरिऑसिटी काही गप्प बसू देईना. मग आले महाशय गोठ्यात! तिकडे त्यांना राहुल-संपदाने शेणावर चालवलेले छोटे छोटे प्रयोगही दिसले. प्रश्नांची नवी गाडी पकडून काळे सुसाट सुटलेच होते, की तेवढ्यात राहुलने म्हटलं, “हे शेणखत म्हणजे दह्याचं विरजण असतं!” झालं... लागला ना काळेंच्या गाडीला ब्रेक! विरजणाचा आणि शेणाचा काय हो संबंध? हाच प्रश्न क्युरिअस काळेंनी राहुल आणि संपदाला विचारला. त्याचं उत्तर फक्त काळेंनाच नाही...