आमचा प्रवास
एका YouTube चॅनेलपासून
मराठी मंचापर्यंत
स्वयं टॉक्सचं चॅनेल ऑक्टोबर २०१२ मध्ये सुरू झालं. उद्देश एकच — मोठ्या नावांऐवजी, मोठं काम करणाऱ्या माणसांना मंच देणं. आज ११०० हून अधिक व्हिडीओ, ३० हून अधिक मालिका आणि साडेचार लाख सबस्क्राइबर्स.
“प्रेरणा ही भाषणातून नाही, प्रामाणिक गोष्टीतून मिळते.”
-
2012
YouTube चॅनेल सुरू
२ ऑक्टोबर २०१२ रोजी स्वयं टॉक्सचं चॅनेल सुरू झालं.
-
2017
पहिले टॉक्स ऑनलाइन
ज्ञानेश्वर बोडके यांचा शाश्वत शेतीवरचा टॉक — आजवर १८ लाखांहून अधिक व्ह्यूज. किरण पुरंदरे यांची नागझिऱ्यातली गोष्टही याच काळातली.
-
2018
स्वयं टॉक्स पुणे
मंचावरचे कार्यक्रम सुरू. डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासारख्या वक्त्यांच्या गोष्टी लाखो लोकांपर्यंत पोहोचल्या.
-
2023
मुंबई, पुणे, संभाजीनगर
एकाच वर्षात तीन शहरांत आवृत्त्या. सोबतच यक्षप्रश्न आणि ‘घर करा रे प्रसन्न’सारख्या वेब सीरिज.
-
2024
अभिमानास्पद महाराष्ट्र
स्वयं ओरिजिनल डॉक्यु-सिरीज — नागझिरा, मिरजेची तंतुवाद्यं, येवल्याची पैठणी आणि सह्याद्री फार्म्स.
-
2026
Kurious काळे आणि मुंबई २०२६
शिक्षण-पालकत्वावरची नवी मालिका, आणि मुंबई २०२६ ची आवृत्ती.