नाशिकची अद्भुत अदिवासी शाळा || Kurious काळे EPISODE 02
8.8K views
April 9, 2026
56:51
About this talk
महाराष्ट्राच्या सीमाभागात — जिथून गुजरात बॉर्डर फक्त १५ किलोमीटरवर आहे — अशा डोंगराळ आदिवासी पाड्यावर वसलेली एक जिल्हा परिषदेची शाळा.
ही शाळा सापडली कशी? आमचे Kurious काळे गेले ना शोध घेत तिथपर्यंत. तसंही, चाकोरीची वाट सोडून ‘हटके’ काम करणाऱ्या व्यक्तीच आमच्या काळेंना हव्या असतात. Kuriosity शमवायची असते ना! पण या शाळेने Kurious काळेंनाही धक्का दिला राव. शंभरेक मुलांची पटसंख्या असलेली ही शाळा बारा तास आणि वर्षाचे ३६५ दिवस सुरू असते. मुलं स्वखुशीनंच शाळेत येतात. घरी जायची घाईच नसते कुणाला. त्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याला उभं करा आणि सांगा म्हणायला पाढा! अहं! १२, १५ आणि २८चा नाही. घ्या ना जरा...